‘जागतिक पाणी दिना’निमित्त शिंदी येथील प्राथमिक शाळेत शिबीर संपन्न

चाळीसगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, ‘जागतिक जल दिनानिमित्त शिबीर संपन्न झाले.

मंगळवार, दिनांक २२ मार्च रोजी सकाळी ८ वा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी, ता.चाळीसगाव, जि.जळगाव येथे तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ चाळीसगाव आणि आय.सी.आय.सी.आय. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दिवाणी न्यायाधीश तालुका विधीसेवा समिती चाळीसगावचे अध्यक्ष एन.के.वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागतिक पाणी दिनानिमित्त शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या पुजनाने झाली. त्यानंतर न्यायाधीश एन.के.वाळके यांच्या हस्ते ‘वर्षा जल संचयन प्रणाली’ चे उद्घाटन करण्यात आले. या शिबीरात चाळीसगाव तालुका वकील संघाचे सदस्य अॅड.साईनाथ महाजन यांनी ‘जागतिक पाणी दिवस’ या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय धुळे येथील विधी विद्यार्थी हेमंत जाधव यांनी ‘सार्वजनिक उपयोगिता सेवा व सरकारी योजना’ या विषयावर मार्गदर्शन केले. चाळीसगाव तालुका वकील संघाचे सदस्य अॅड.एल.एच.राठोड यांनी ‘पाणी आडवा आणि पाणी जिरवा’ या विषयावर मार्गदर्शन केले.

न्यायाधीश एन.के.वाळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘जागतिक पाणी दिवस’, ‘दखलपूर्व मध्यस्थी आणि व्यावसायिक वादात तोडगा’ तसेच ‘आरोपींचे हक्काबाबत कायदेशीर जागरुकता आणि त्यांच्यासाठी कायदेशीर सेवांचा लाभ’ या विषयावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाची प्रस्तावना आय.सी.आय.सी.आय.फांऊडेशनचे जिल्हा विकास अधिकारी गणेश बोरगे यांनी केली. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन उपशिक्षक राजेंद्र वाघ, यांनी केले तर चाळीसगाव तालुका वकील संघाचे सदस्य दुर्गेश सुर्यवंशी यांनी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमास चाळीसगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.बी.के.पाटील, चाळीसगाव तालुका वकील संघाच्या खजिनदार अॅड. वर्षा देवरे, चाळीसगाव तालुका वकील संघाचे सदस्य जेष्ठ अॅड.जी.एस.दौंड, आय.सी.आय.सी.आय. फाऊंडेशन चाळीसगावचे तालुका समन्वयक प्रविण भंडारे, शिवाजी पावरा, अजिंक्य कसबे आणि गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील मान्यवर हजर होते. सदर शिबीर यशस्वी करण्याकरिता डी.के.पवार, डी.टी. कु-हाडे, के.डी.पाटील चाळीसगाव तालुका वकील संघाचे सदस्य अॅड.समाधान राठोड, शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण, कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Protected Content