ठाकरे चित्रपटाचा पहिला शो शिवसैनिक सामूहिकपणे पाहणार !

चाळीसगाव प्रतिनिधी । उद्या प्रदर्शीत होणार्‍या ठाकरे या चित्रपटाचा पहिला शो चाळीसगाव तालुक्यातील सर्व शिवसैनिक सामूहिकरित्या पाहणार आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित बहुचर्चित ठाकरे चित्रपट उद्या दिनांक २५ जानेवारी रोजी संपूर्ण देशभर प्रदर्शित होत असून संपूर्ण शिवसैनिकांसह बाळासाहेब यांच्यावर प्रेम करणारे माणसे या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. उद्या दिनांक २५ रोजी चाळीसगाव शहरातील राज चित्रपट गृहात या चित्रपटाचे प्रदर्शन होणार असून चित्रपट पाहण्यासाठी असंख्य शिवसैनिकांच्या समवेत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख तथा माजी आमदार आर. ओ. पाटील, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख नाना कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख भिमराव खलाणे, तालुका संघटक सुनील गायकवाड, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, निलेश गायके, युवा सेना तालुकाप्रमुख प्रशांत कुमावत, शहर प्रमुख रवी चौधरी आदी प्रमुख पदाधिकारी हा चित्रपट पाहण्यासाठी सामूहिक रित्या अकरा वाजून ४५ मिनिटांच्या पहिला शोला हजर राहणार आहेत.

तमाम बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणार्‍या प्रेमींनी या चित्रपटास प्रचंड प्रतिसाद देऊन शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि चरित्र जाणून घेण्याचा सुवर्ण लाभ घ्यावा असे आवाहन चाळीसगाव शहर शिवसेना तालुका शिवसेना पदाधिकार्‍यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content