Browsing Tag

shivsena

राजकारणात कुणी कायम मित्र वा शत्रू नसतो-पालकमंत्री ( Video )

जळगाव प्रतिनिधी । राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये असे सांगतांनाच राजकारणात कुणी कायम मित्र वा शत्रू नसतो असे सूचक वक्तव्य पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज केले.

देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत

मुंबई । उत्तर भारताप्रमाणे आम्ही द्वेषाचे राजकारण करत नसल्याचे नमूद करत देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

सरकारने शेतकरी, कामगारांचे मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहू नयेत- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । देशातील कामगार व शेतकरी अशा कोंडीत फसले आहेत की, त्यांना जगणे कठीण झाले आहे. देशातला विरोधी पक्ष क्षीण बनला आहे म्हणून सरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला आज शिवसेनेने दिला आहे.

फडणवीस सरकारच्या बहुमतासाठी काही अधिकारी झटत होते- शिवसेना

मुंबई । गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोपांना पुष्टी देत फडणवीस सरकारच्या बहुमतासाठी राज्यातील काही अधिकारी झटत होते असा आरोप आज शिवसेनेने केला आहे. यात गुप्तचर खात्याचाही समावेश असल्याचा धक्कादायक आरोप देखील करण्यात आला आहे.

गोंधळाच्या गर्तेत देश गटांगळ्या खातोय- शिवसेनेची टीका

मुंबई ।... फक्त चार तासांच्या सूचनेवर २१ दिवसांच्या कडक लॉक डाऊनची घोषणा केली जाते. त्या दिवसापासून सुरू झालेला गोंधळ व अनिश्‍चितता आजपर्यंत कायम आहे. इतका गोंधळ कधीच झाला नव्हता. त्या गोंधळाच्या गर्तेत देश गटांगळ्या खात असल्याची टीका आज…

मुंबई व महाराष्ट्राच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर- शिवसेनेचा आरोप

मुंबई । सोशल मीडीयाचा वापर मुंबई व महाराष्ट्राच्या बदनामीसाठी करण्यात येत असून सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांनी समाजमाध्यमांबाबत केलेले भाष्य हे चिंतनीय असल्याचे प्रतिपादन आज शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

भारताला ऑलिंपिकमध्ये ‘पोरखेळ’ या प्रकारात पदक हमखास मिळणार- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । देशात सध्या जो काही खुळचट, बुळचट प्रकार सुरू आहे तो पाहता, देशाला ऑलिंपिकमध्ये 'पोरखेळ' या प्रकारात सुवर्ण पदक नक्की मिळणार असा टोला आज शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

मुंबईला कमी लेखणे म्हणजे स्वत:साठी खड्डा खणणे- शिवसेनेचा इशारा

मुंबई । मुंबईला कमी लेखणे म्हणजे स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणणे असल्याचा इशारा शिवसेनेने आज दिला असून या माध्यमातून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

देशद्रोही व सुपारीबाजांना पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरी’च- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा 'हरामखोरी'च म्हणजे मातीशी बेइमानीच असल्याचे सांगत शिवसेनेने आज जोरदार टोला लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र…

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील शिवसेनेचे प्रवक्ते !

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातर्फे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

‘ही’ मंडळी हुतात्म्यांचा अपमान कशी सहन करू शकतात : शिवसेना

मुंबई । महाराष्ट्र हा जितका शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा आहे तितकाच तो भाजपचाही असायला हवा. यामुळे महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कशी सहन करू शकतात ? असा प्रश्‍न आज शिवसेनेने उपस्थित केला आहे.

देशाच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले ? : संजय राऊतांचा सवाल

मुंबई । कोरोना देवाची करणी असे केंद्र सरकारनेच जाहीर केल्यामुळे सरकारची जबाबदारी संपली हे पाहिले व देवदूत डॉक्टरांचाही निकाल लावला. हिंदुस्थानच्या अर्थमंत्र्यांनी केलेले विधान आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणार्‍या देशाला शोभणारे नाही. देशाच्या…

कर्तबगारी व राज्याची गरज पाहून बदल्या झाल्या- शिवसेना

मुंबई । राज्यातील पोलीस अधिकर्‍यांच्या बदल्या या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून केल्या असून ती अधिकार्‍यांची कर्तबगारी व राज्याची गरज पाहून करण्यात आल्याचे सांगत शिवसेनेने आज या प्रकरणी भाजपवर टीका केली आहे.

भाजप नेत्यांचे चप्पल घालून आंदोलन : शिवसेनेने केले शुध्दीकरण !

मुक्ताईनगर प्रतिनिधी । घंटानाद आंदोलनाच्या अंतर्गत येथील मुक्ताई मंदिरात भाजप नेते व पदाधिकार्‍यांनी चपला घालून आंदोलन केल्यानंतर शिवसेना व युवासेनेने मंदिरासह परिसराचे शुध्दीकरण केले. यामुळे येथे भाजप व सेनेत पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी…

राहूल यांना आणा…नाही तर लोक नाटकाचे पडदे व प्रॉपर्टी चोरून नेतील ! – शिवसेना

मुंबई । काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा पत्रप्रचंच म्हणजे फसलेले नाटक असल्याचे नमूद करत राजकीय मंचावर राहूल गांधी यांना लवकर आणा...अन्यथा लोक नाटकाचे पडदे व प्रॉपर्टी चोरून नेतील असा सल्ला वजा इशारा आज शिवसेनेने काँग्रेसला दिला आहे.…

लढनेवाले बापका लढनेवाला बेटा हू ! : उध्दव ठाकरे

मुंबई । सोनिया गांधी यांनी भाजपेतर मुख्यमंत्र्यांच्या बोलावलेल्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना दिलेल्या उत्तरात लढनेवाले बापका लढनेवाला बेटा असू ठणकावून सांगितले. त्यांचा हा बाणा आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मोदी…

रस्त्यावरील खड्डयांमध्ये कागदी होड्या; शिवसैनिकांचे अनोखे आंदोलन !

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्डयांनी नागरिक हैराण झाले असल्याने येथे शिवसेनेतर्फे यात साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून निषेध व्यक्त केला. तसेच नागरिकांना झेंडू बाम व आयोडेक्सचे वाटप करण्यात आले. भुसावळातील…

मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षांची करणार तक्रार- शिवसेनेची आक्रमक भूमिका

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शहराच्या विकासाला खीळ बसल्याचा आरोप करत या प्रकरणी नगराध्यक्षांची नगरविकास मंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती शिवसेनेतर्फे…

मध्य प्रदेशने राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला तेव्हा सगळे चिडीचुप का ? : शिवसेना

मुंबई । प्रत्येक राज्याने भूमिपुत्रांचा विचार करावा. त्यांना रोजगारात प्राधान्य मिळावे हे घटनेनुसारच आहे, पण त्या घटनेनुसार महाराष्ट्राने भूमिपुत्रांचा विचार केल्यावर देशाला राष्ट्रीय एकात्मतेची उचकी लागते. मध्य प्रदेशने त्याच राष्ट्रीय…

…हा तर कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । अभिनेते सुशांत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस चांगला तपास करत असतांना सीबीआयकडे तपास सोपविण्याचा निर्णय हा कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
error: Content is protected !!