शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी अफसर खान !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक अफसर खान यांची शिवसेनेच्या अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून अफसर खान यांची ख्याती आहे. अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा संघटक म्हणून त्यांची उत्तम कामगिरी बजावली आहे. याची दखल घेत शिवसेनेच्या अल्पसंख्य आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अल्पसंख्य प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी त्यांना आज सदर नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.

या माध्यमातून अफसर खान यांना आता प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळणार आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. त्यांच्या नियुक्तीचे अल्पसंख्यांक समाजातून देखील मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले आहे. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम आपण आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत असा मानस त्यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजसोबत बोलतांना व्यक्त केला.

Protected Content