चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने बालकांना विषबाधा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गांधली येथील दहा बालकांना चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याची घटना आज घडली असून आता या सर्व चिमुकल्यांची प्रकृती सुदैवाने धोक्याबाहेर आहे.

या संदर्भात जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार अमळनेर तालुक्यातील गांधली येथील दहा बालकांना चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यानंतर अचानक त्रास सुरू झाला. या बालकांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुलांच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. मुलांची प्रकृती स्थिर असली तरीही सावधानतेचा अतिरिक्त उपाय म्हणून बालरोगतज्ज्ञ यांचे पथक अमळनेर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दूरध्वनी द्वारे घटनेची माहिती जिल्हाधिकारी यांचेकडून जाणून घेतली. विषबाधेचे कारण निश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक संबंधित गावात पाठविणेचे ग्रामविकास मंत्री यांनी निर्देश दिले आहेत.

दरम्यान, गांधली येथील घटनेची माहिती मिळताच मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी तात्काळ ग्रामिण रुग्णालयातील डॉक्टरांना तातडीने उपचार करण्याच्या सूचना केल्या तसेच नातेवाईकांना देखील फोन करून धीर दिल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेशी संवाद साधत जिल्हा स्तरावरून बालरुग्ण डॉक्टरांची टीम पाठविण्याच्या सूचना केल्याने तातडीने टीम रवाना करण्यात आली.बक्षितांश मुलांची प्रकृती स्थिर असल्याने मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

Protected Content