वैद्य नरेंद्र गुजराथी यांच्या पेटंटला मान्यता

narendra gujrathiजळगाव प्रतिनिधी । येथील ख्यातप्राप्त वैद्य नरेंद्र गुजराथी यांच्या पेटंटला मान्यता मिळाली असून त्यांचे हे तिसरे पेटंट आहे.

वैद्य नरेंद्र गुजराथी यांनी ‘ए पोसेस फॉर प्रिप्रेशन ऑफ गेल अ‍ॅनिमा कम्पोझिशन’ म्हणजे गेल एनिमा रचना तयार करण्यासाठी एक प्रक्रियेसाठी पेटंट मिळवले आहे. एनिमा घेण्याअगोदर प्रत्येक वैद्याला औषधी काढा करून त्वरीत द्यावा लागतो. वैद्य गुजराथी यांच्या संशोधनामुळे उपचारापूर्वी काढा करण्याची झंजट कमी झाली. इन्स्टंट काढा बनविणे सोपे झाल्याने वैद्यांच्या वेळेची बचत होणार आहे. रुग्णांवर त्वरीत उपचार करणे सोपे झाले. हे औषध दीर्घकाळ कमी मात्रेत स्टोअर करणे सोपे होणार आहे.

दरम्यान, सर्वात महत्वाची बाब म्हणजे आयुर्वेदामध्ये तीन पेटंट मिळवणारे वैद्य गुजराथी हे देशभरात पहिले संशोधक ठरले आहे. त्यांना २०१० मध्ये स्वयं एनिमा उपकरणासाठी पहिले तर २०१६ स्थानिक फ्युमिगेशनसाठी एक यंत्रासाठी दुसरे पेटंट त्यांना प्राप्त झाले आहे. यानंतर आता त्यांना तिसरे पेटंट प्रदान करण्यात आले आहे. या संशोधन कार्यात प्रसिध्द पेटंट अ‍ॅटोर्नी प्रा. कानन पुराणिक, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान विभागाचे डॉ. व्ही. एल. माहेश्‍वरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Add Comment

Protected Content