Home आरोग्य चोपड्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक साहित्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

चोपड्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक साहित्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

0
1


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेले सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांच्या विशेष प्रयत्नांतून चोपडा येथे सहाय्यक साहित्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी पार पडलेल्या या शिबिराला ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा प्रतिसाद लाभला. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंजली बर्गे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार दैनंदिन कामकाजात विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना आवश्यक असलेले सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यापूर्वी योग्य तपासणी आणि गरजांचे मूल्यांकन व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या आवश्यकतांची तपासणी करून त्यांना उपयुक्त सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाला चालना देण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नायब तहसीलदार डी. आर. सैंदाणे, नायब तहसीलदार योगेश पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रसाद पाटील, डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील, कांतिलाल पाटील सर, पूर्व विभागाचे अध्यक्ष पिंटू पावरा, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संध्याताई महाजन, जिल्हा उपाध्यक्षा खटाताई कोळी यांचीही उपस्थिती होती.

तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष हिंमतराव पाटील, सरचिटणीस मनोज सनेर, सरचिटणीस योगराज जाधव, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, माजी सरचिटणीस लक्ष्मण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटील, भाजपाचे माजी शहराध्यक्ष रवींद्र मराठे, युवा मोर्चाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, नरेश महाजन, नगरपरिषद गटनेते व नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, आत्माराम सोनवणे आणि युवा मोर्चाचे सरचिटणीस राकेश बागुल उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. पवन पाटील, डॉ. स्वप्ना पाटील, डॉ. गौरव नेवे तसेच केंद्रप्रमुख डॉ. गणेशकर यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी सहभागी झाले होते. शिबिराच्या आयोजनात आरोग्य यंत्रणेचा सहभाग महत्त्वाचा ठरला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound