भाजप जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारिणी जाहीर !

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाची जळगाव पूर्व अर्थात रावेर लोकसभा मतदारसंघासाठीची कार्यकारिणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी जाहीर केली असून यात संतुलन साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी भारतीय जनता पक्षाने तीन जिल्हाध्यक्ष दिले असून यात पूर्व भागाची जबाबदारी ही अमोल हरीभाऊ जावळे व पश्‍चीमची जबाबदारी ही ज्ञानेश्‍वर पाटील महाराज जळकेकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आलेली आहे. तर, जळगाव महानगराध्यक्षपदाची धुरा उज्वलाताई बेंडाळे यांना सोपविण्यात आली आहे. यापैकी पहिल्यांदा जळगाव महानगर आणि त्याच्या पाठोपाठ जळगाव पश्‍चीमची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता पूर्व विभागाची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश प्रभारी रवी अनासपुरे व आमदार संजय सावकारे यांच्या सूचनेनुसार नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष आदींसह विशेष निमंत्रीत सदस्यांचा समावेश आहे.

नवी कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र चौधरी व पद्माकर महाजन-रावेर; तुकाराम निकम-जामनेर; शरद महाजन व हिरालाल चौधरी-यावल; दलपत चव्हाण व श्रीमती नजमा तडवी-मुक्ताईनगर; सतीश सपकाळे आणि सुनील काळे-भुसावळ; मधुकर राणे-बोदवड; अंबादास शिसोदिया व ज्योत्स्ना जितेंद्र पाटील-चोपडा तसेच मधुकर राणे-बोदवड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

जिल्हा सरचिटणीस म्हणून : राकेश पाटील-चोपडा; हरलाल कोळी-रावेर; आतीश झाल्टे-जामनेर; परिक्षीत बर्‍हाटे-भुसावळ; वैशाली कुलकर्णी बोदवड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हा चिटणीस म्हणून राजन लासूरकर-रावेर; राजधर पांढरे-जामनेर, भालचंद्र पाटील-भुसावळ; उज्वला माळके-चोपडा; विजय बडगुजर बोदवड; श्रीकांत महाजन-रावेर; खुशाल जोशी-भुसावळ; प्रफुल्ल लुंकड-जामनेर; सविता भालेराव-यावल; गोमती बारेला-रावेर; गुणवंत पिवटे-मुक्ताईनगर; ललीत महाजन-मुक्ताईनगर; परमेश्‍वर टिकारे-बोदवड; रणछोड पाटील-चोपडा; रेखा बोंडे भुसावळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून नंदकिशोर महाजन-रावेर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

नवनियुक्त कार्यकारिणीचे पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी स्वागत केले आहे.

Protected Content