रावेर येथे ना. गडकरी यांच्या जिल्हा दौऱ्यानिमित्ताने महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

रावेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आगामी २२ तारखेला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमीपुजन होणार आहे. या सोहळ्याला जास्तीत-जास्त नागरीकांनी उपस्थित राहण्याचे अवाहन भाजपा जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके यांनी केले आहे.

 

रावेर शहरातील भाजपा कार्यालयात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या दौऱ्यानिमित्त महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला माजी शिक्षण सभापती सुरेश धनके यांनी मार्गदर्शन केले. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन येत्या २२ तारखेला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते जळगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अहवान भाजपातर्फे करण्यात आले आहे. बैठकीला जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी पि के महाजन भाजपा सरचिटणीस महेश चौधरी माजी उपसभापती सुनिल पाटील, महेश पाटील आदी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content