शिवसैनिकांनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज रहावे : मनोज हिरवे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात ना. गुलाबराव पाटील यांच्यासारखे सक्षम नेतृत्व असून आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे यांनी केले. आज संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्या मेळाव्यात ते बोलत होते.

शिवसेनेतर्फे मनोज हिरवे यांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर आज त्यांच्यासह ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख मनोज हिरवे हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. त्या निमित्ताने त्यांचा सत्कार शिवसेना नेते तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते करण्यात आला.

बैठकीप्रसंगी ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या हृदयात असून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच कार्यकर्त्यांच्या निवडणुका येत असून यात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. ६ नोहेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याकरिता शिवसैनिक व युवासैनिकांनी सज्ज राहावे. पक्ष संघटनेला महत्त्व देऊन सर्वांनी एकदिलाने काम करावे. महिलांचा प्रभाव या ग्रामपंचायतीवर दिसणार असल्याने कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या महिलांना निवडणुकीत उभे करावे. सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांनी दिवसरात्र मेहनत घ्यावी अश्या सूचनाही ना. गुलाबराव पाटील यांनी केल्या.

दरम्यान, जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले की, कार्यकर्त्यांची एकजूट महत्वाची आहे तसेच तालुक्यातील गाव गाव आणि घर घर शिवसैनिक नोंदणी करून शिवसेनेची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्याचे काम करण्याचे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी तालुक्यातील जळगाव व धरणगाव तालुक्यातील ३२ ग्रा पं तीचे निवडणूक बाबत तसेच शिवसेना बांधणी बाबत सविस्तर माहिती विषद केली. सूत्रसंचालन तालुकाप्रमुख शिवराज पाटील यांनी केले तर तर आभार धरणगाव तालुका प्रमुख डी.ओ. पाटील यांनी मानले.

व्यासपीठावर महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, शहर संघटक दिलीप पोकळे , उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, पी. एम. पाटील , मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख तथा पं. स. सभापती मुकुंद नन्नवरे , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, श्याम कोगटा जळगाव व धरणगाव तालुका प्रमुख शिवराज पाटील, डी.ओ. पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे,माजी सभापती. नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील, तुषार महाजन, वासुदेव चौधरी, महिला आघाडीच्या महानगर प्रमुख शोभा चौधरी, ज्योतीताई शिवदे, प्रिया इंगळे, गिरीश सपकाळे, आशुतोष पाटील, चेतन संकत अजय देशमुख, हर्शल मावळे, शंतनू नारखेडे यांच्यासह जळगाव शहर व जळगाव ग्रामीण मतदार संघातैल शिवसेना , युवसेना व महिला आघाडीच्या पदधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content