मोहाडी रोडवरील अपार्टमेंटमध्ये चोरी; पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रोडवारील एका अपार्टमेंटमध्ये बंद घर फोडून घरातून २ हजार रूपयांची रोकड आणि चांदीच्या वस्तू असा एकुण ६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे आज गुरूवारी सायंकाळी उघडकीला आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, योगराज परशुमराम चिंचोरे (वय-३९) रा. लिलावधी जैन अपार्टमेंट, मोहाडी रोड जळगाव हे खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. गुढीपाडव्याच्या निमित्ताने चिंचोरे हे जळगाव येथील घराला कुलूप लावून परिवारासह म्हसावद ता. जि.जळगाव येथे राहत्या घरी गेले. दरम्यान १५ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजता चिंचोरे यांना त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे नाना बोरसे यांनी घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार चिंचोरे हे १५ एप्रिल रोजी सायंकाळी घरी आले असता घरातील कपाटातून अज्ञात चोरट्यांनी सामान काढून अस्तव्यस्त केलेले दिसून आले. तर कपाटातील २ हजार रूपयांची रोकड आणि ४ हजार रूपये किंमतीचे चांदीच्या वस्तू असा एकुण ६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. योगराज चिंचोरे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण जगदाळे करीत आहे. 

Protected Content