यावल येथे आठ ग्रामपंचायतीचा सात सरपंच एक बिनविरोध

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या सात सरपंच पदासाठी व ७८सदस्य निवडीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी येथील तहसील कार्यालयाच्या मध्यावर्ती सभागृहामध्ये तहसिलदार महेश पवार, निवासी नायब तहसिलदार संतोष विंनते, निवडणुक नायब तहसिलदार आर.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली. मतमोजणीनंतर विजयी उमेदवार समर्थकांनी जल्लोष केला .

 

तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्य पदासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी शांततेत पार पडली.  आठ ही ग्रामपंचायतीत कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविली नसली तरी राजकीय पक्षाकडून दावे प्रति दावे केले जात आहेत. यात१७ सदस्य संख्या असलेल्या सर्वात मोठया ग्रामपंचायतच्या न्हावी प्र. यावल येथील सरपंचपदाचे उमेदवार देवेंद्र भानुदास चोपडे हे मोठया मतधिक्याने विजयी झाले असून ते ठाकरे गटाचे शिवसेनेचे  उमेदवार असल्याचा दावा केला जात आहे.  तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मसाका चेअरमन शरद महाजन यांचे नेतृत्वाखाली पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार तथा जिल्हा दूध संघाचे नवनिर्वाचित संचालक नितीन चौधरी यांचा त्यांनी दोन हजार ३४३ मतांनी पराभव केला आहे . या लढतीकडे तालुकावाशीयांचे लक्ष लागून होते .

सकाळी दहा वाजेच्या सुमारास मतमोजणीचा प्रारंभ झाला पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात सगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गावनिहाय सरपंच पदाचे व सदस्य पदाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे

कासारखेडे ग्रामपंचायतच्या  सरपंचपदी नजीमा मुराद तडवी(४५०)

तर ग्राम पंचायतच्या सदस्यपदी नंदाबाई भास्कर भालेराव(२२२), अश्विनी रामप्रसाद पाटील(१८१),रमजान नबाब तडवी (३००) तर उमेदा मुराब तडवी,

रसूल रहमान तडवी, दिलीप माधवराव पाटील,  सलीमा रहमान तडवी ( सर्व बिनविरोध ).

 

चिखली बुद्रुक, ग्रामपंचायतच्या सरपंच जानकीराम मधुकर पाटील २२४ ग्रामपंचायत सदस्य पदावर प्रशांत मुरलीधर तायडे १६९, तर दिलीप आनंदा पाटील, रूपाली सहदेव पाटील, युवराज हुना महाजन, रेखा सिताराम महाजन, मीना शालीक तायडे,  शोभा प्रकाश सावळे( सर्व बिनविरोध ).

चिखली खुर्द ग्राम पंचायतच्या सरपंचपदी सायरा गणेश सोनवणे (२७२) तर सदस्य म्हणुन-चंद्रकला देविदास इंगळे (१३१), कोमल पंडित झोपे (८५) , चारुलता प्रवीण फिरके (१२५) , जितेंद्र दुर्गादास पाटील (११६), प्रवीण तुळशीराम फिरके (८८), रजनी केशव पाटील (१२२) तर सोनाली गोविंदा सोनवणे बिनविरोध.

चितोडा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अरुण देविदास पाटील ३४३ मतांनी विजयी झाले असुन , ग्राम पंचायत सदस्यपदी योगेश वासुदेव भंगाळे (१४७), चंद्रकांत सुरेश जंगले (२६४), उज्वला संदीप पाटील, राजू हिरामण कुरकुरे,  प्रदीप मेघश्याम धांडे, बेबी कडू पाटील,  हर्षा गोकुळ पाटील, राधिका पंकज वारके,  सिंधू ज्ञानदेव टोंगळे (सर्व बिनविरोध).

 

चुंचाळे ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पुढील प्रमाणे सरपंच नौशाद मुबारक तडवी ( ९१९), सदस्य रहमान मेहरबान तडवी (२२१), मनोज फकीरा धनगर (३८३), संजय देविदास पाटील (२२९), ईश्वर चिट्ठी व्दारे विजयी झालेत तर सपना दीपक कोळी (३७५), सरला सुधाकर कोळी (३५९), जरीना मजीद तडवी (२९७), आस्मिन कदीर तडवी (२६२) ,कुर्बान जाफर तडवी(३१९), बैतूल कलिंदर तडवी(३८२).

न्हावी प्र यावल ग्राम पंचायतच्या सरपंचपदी शिवसेना ( ठाकरे ) गटाचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिवसेनेचे माजी संचालक भानुदास चोपडे यांचे चिरंजिव देवेंद्र भानुदास चोपडे (४८३५) विजयी झाले असुन त्यांनी मसाकाचे माजी चेअरमन शरद जिवराम महाजन यांचे अत्यंत विश्वासु व माजी सरपंच यांचे पती नितीन नारायण चौधरी(२४९२) यांना मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले आहे तर न्हावी ग्रामपंचायत साठी इतर उमेदवार  विजयी झालेले सदस्य पुढील प्रमाणे चेतना आनंदा इंगळे (५८६), नितीन चिंधु इंगळे (५७४), योगिता सचिन इंगळे (४०९), प्रभाकर पंडित कोळी( ८२१), सविता गिरीश गाजरे (४२६), मयूर सुनील चौधरी   (६४९), हेमांगी चेतन झोपे (३९५), यशवंत माधव तळेले( ४६२), रवींद्र रमेश तायडे     (३५९), रूपाली विश्वनाथ तायडे (५८०), पोर्णिमा सुधाकर पाटील  ( ६६४), शेख गफ्फार शेख याकूब पिंजारी (६९४), शेख नदीम शेख अय्युब पिंजारी(१२७३), स्वीटी उमेश बेंडाळे  (५३२), शोभा शांताराम मोरे(४१८), आरजू सरफराज तडवी (५३०), फातीमा रज्जुक तडवी ( बिनविरोध).

पाडळसे सरपंच -गुणवंती सुरज पाटील(१५२५), सदस्य कविता संजय कोळी (३९५), नामदेव कडू कोळी (२७८), पांडुरंग शामराव कोळी (३४१), सुरेखा सिताराम कोळी (५३०),अरुण नेमचंद चौधरी(२७५),,किरण प्रभाकर तायडे  (४४४),पल्लवी प्रकाश तायडे(४१२),अवंतिका मनीष नेहते  (४२०),उज्वला रवींद्र पाटील(३१९), प्रकाश चिंतामण पाटील  (४८७), हेमलता राजेंद्र बऱ्हाटे  ३८६), सुदेश कडू बाविस्कर(२९६), तुषार रामचंद्र भोई (५३०), अलका रघुनाथ सोनवणे(३९९), पुनम मनोज पाटील (बिनविरोध).

 

पिळोदा बुद्रुक. सरपंच छाया अनिल पाटील (बिनविरोध)  सदस्य प्रमिला सारंगधर पाटील(१२९), विद्या जगदीश महाजन  (१११), धीरज मनोहर चौधरी (बिनविरोध), मयूर दौलत जवरे (बिनविरोध),लतिका सुनील जवरे (बिनविरोध), सुजाता विलास जवरे(बिनविरोध).

Protected Content