आयुक्तांची ‘मॅट’ मधील पुढील सुनावणी ५ जानेवारीला

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यशासनाने मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना कार्यमुक्तीचे आदेश देत नूतन आयुक्तांची नियुक्ती केली होती.  या तडकाफडकी आदेशाविरोधात आयुक्त डॉ. गायकवाड यांनी मॅटमध्ये धाव घेतल्याने आयुक्त देविदास पवार यांच्या नियुक्ती आदेशाला मॅटने स्थगीती दिली होती. याबाबत आज ‘मॅट’ मध्ये आयुक्त देविदास पवार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले असून पुढील कामकाज ५ जानेवारी २०२३ ला होणार आहे.

 

राज्यशासनाने डॉ. विद्या गायकवाड यांची आयुक्तांवर कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले होते. त्यांच्या जागी परभणीचे देविदास पवार यांची जळगाव मनपा आयुक्तपदी बदलीचे आदेश काढले होते. यावर डॉ. गायकवाड  यांनी मॅटमध्ये धाव घेत आयुक्तपदाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळाली होती. याबाबत ९ डिसेंबरला कामकाज झाले होते. यावेळी राज्यशासनाकडून त्यांची बाजू तसेच प्रतिज्ञापत्र मॅटपुढे सादर केले तर आयुक्त देविदास पवार यांनी पुरेसा वेळ न मिळाल्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितली होती. आज झालेल्या कामकाजात आयुक्त पवार यांच्याकडून प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. याबाबत ‘मॅट’ने पुढील कामकाज ५ जानेवारीला ठेवले आहे.

 

Protected Content