खुनाने जळगाव पुन्हा हादरले: तरुणाचा निर्घृणपणे खून

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुने बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून तरुणाचा चाकू भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

आकाश सुरेश सपकाळे (वय-३०) रा.कोळीपेठ, जैनाबाद जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, जळगाव शहरातील जुने बसस्थानक नजीक एका दुकानासमोर दोन गट समोरासमोर आल्याने जुन्या वादातून शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने एकाने आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे या तरूणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केला. तसेच आकाशचा भाऊ सागर सुरेश सपकाळे आणि त्याचा मित्र सागर आनंदा सपकाळे हे दोन जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे जळगाव शहर हादरले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यासह जिल्हापेठ व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनांसाठी दाखल झाले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची प्रचंड गर्दी जमली होती.

तरूणावर वार करणारा आण्णा उर्फ गोपाळ कैलास सैंदाणे रा. कोळी पेठ, जळगाव याला शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, खून करण्याचे नेमके खरे कारण समोर आलेले नसून कसून चौकशीला सुरूवात केली आहे.

Protected Content