संत गाडगेबाबा पुण्यतिथी दिनानिमित्ताने रक्तदान करून अभिवादन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरा येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने माणुसकी ग्रुप कळमसरा व रेड प्लस ब्लड बँक संयुक्त  यांच्या विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

मंगळवार दि. २० डिसेंबर  रोजी रक्तदान शिबीर सकाळी ९ वाजेपासून दुपारी १ वाजे पर्यंत घेण्यात आले. या उपक्रमास कळमसरा गावाचे सरपंच अशोक चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या वंदना चौधरी, डॉ.महेंद्र गीते, डॉ.प्रियंका गीते गीते (संचालक डेंटल क्लिनिक शेंदुर्णी), प्रशांत महाले, जामनेर हे मान्यवर उपस्थित होते. डॉ. गीते परिवाराने प्रत्येक रक्तदात्यास श्रीमद् भगवतगीता जीवन ग्रंथ भेट दिला. “माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे” हा खरा धर्म संत गाडगे महाराज यांनी सांगितला त्यामुळे आपण रक्तदान करून प्रत्येक माणसाला मदत करण्यासाठी पुढे आलो पाहिजे असे माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हाध्यक्ष  गजानन क्षीरसागर यांनी सांगितले. प्रत्येक रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला गौरव पत्र व श्रीमद् भगवतगीता जीवन ग्रंथ देऊन गौरवण्यात आले. यावेळी गजानन तेली, श्रावण न्हावी, प्रशांत महाले, शिवाजी माळी, तुषार उशीर, विजय धोबी, गोपाल माळी, गजानन पाटील, गणेश पांडव, दत्तात्रय तेली  आदींनी सहकार्य केले.  रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक, जळगाव यांनी परिश्रम घेतले.

Protected Content