Home Cities अमळनेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या तालुका प्रमुखपदी प्रथमेश पवार

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या तालुका प्रमुखपदी प्रथमेश पवार

0
167


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या अमळनेर तालुका प्रमुखपदी युवा नेते प्रथमेश मधुकर पवार ( पाटील) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बाळासाहेब शिवसेना पक्षाच्या (शिंदेगट) अमळनेर तालुका प्रमुखपदी प्रथमेश मधुकर पवार ( पाटील ) यांची नियुक्ती पक्षाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सचिव संजय मोरे ांनी पत्राद्वारे केली आहे. प्रथमेश पवार हे टाकरखेडे येथील जिजाऊ आयटीआयचे संचालक असून माजी भाजपा नेत्या सुरेखा ताई पवार (कंडारी) यांचे चिरंजीव आहेत. त्यांना घरातूनच राजकीय सामाजिक वारसा लाभला आहे. अमळनेर तालुक्यात युवा नेतृत्वाला पक्ष वाढीची जबाबदारी दिल्याने निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

दरम्यान, या निवडीबद्दल जिल्ह्याचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार चिमणराव पाटील , जिल्हाप्रमुख रावसाहेब जिभू पाटील, जिल्हा पदाधिकारी वासुदेव पाटील, अमळनेरचे माजी नगरसेवक संजय कौतीक पाटील, सुरेश अर्जुन पाटील, माजी सभापती दीपक पाटील, माजी नगरअध्यक्ष प्रभाकर नारायण पाटील यांच्या सह शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते आदींनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound