यावलच्या बीडीओ अ‍ॅक्शन मोडवर : कामचुकार धास्तावले

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पंचायत समितीच्या कर्मचार्‍यांच्या मनमानीला चाप घालण्यासाठी बीडीओंनी नोटीसा बजावल्यामुळे कामचुकार कर्मचारी धास्तावले आहेत.

यावल येथील पंचायत समिती मधील विविध विभागाअंतर्गत प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी हे आपल्या कार्यालयीन कर्तव्यावर कुठलीही रजेची परवानगी न घेता हजर राहात नसल्याचे प्रकार आढळून आले होते. या अनुषंगाने सदर गैरहजर अधिकारी व कर्मचारी यांच्या विरूद्ध कार्यालयीन शिस्तभंगाची कार्यवाही का करण्यात येवु नये अशी नोटीस गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांनी संबधीतांना काढल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे

यावल पंचायत समितीय्या माध्यमातुन ग्रामीण पातळीवरील नागरीक ग्राम पंचायतच्या विविध कामा निमित्ताने वेळात वेळ काढून येत असतात. मात्र यावल पंचायत समितीच्या कार्यालयात संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे मिळत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात नागरीकांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्याकडे लिखित तक्रारी केल्याने या बाबत काहींना गैरहजर राहण्या बाबत नोटीस काढण्यात आल्या आहेत. यापुढे कार्यालयीन वरिष्ठांची परवानगी न घेता किंवा पुर्व सुचना न देता गैरहजर राहील्यास सेवा कमी करण्यात येईल अशी नोटीस काढली आहे.

बीडीओंनी कडक पवित्रा घेतल्याने तरी आता कामचुकार कर्मचारी हे यापुढे तरी सुधरणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content