ब्राम्हणे ग्रामपंचायत बिनविरोध; सरपंच व उपसरपंच यांनी घेतला पदभार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील ब्राम्हणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभा सनेर तर उपसरपंचपदी विजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच आणि उपसरपंच यांनी आज पदाची सुत्रे हातात घेतली आहे.

कुठल्याही निवडणुका म्हटल्या तर स्पर्धा, चढाओढ, फितुरी, हमरा तुमरी, मारामाऱ्या, भांडण तंटे, पैशाचा गैरवापर, आज हे चित्र सर्रास दिसते त्यातून विकासाला खीळ बसते या सर्व गोष्टी बाजूला सारून अमळनेर तालुक्यात आपला एक वेगळा ठसा उमटवणारे ब्राम्हणे गाव वरील सर्व गोष्टींपासून अलिप्त आहे.

पांजरा नदीच्या काठी वसलेले लहानसे ब्राम्हणे गावात एक सुंदर विलोभनीय विठ्ठल मंदिर आहे त्यामुळे येथील लोकांचा धार्मिकतेकडे अधिक कल आहे कोणतीही शासनाची योजना यशस्वीरित्या राबवून गावाचा विकास कसा साधावा याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ब्राम्हणे गाव गेल्या पंचवीस वर्षापासून एखादा अपवाद वगळता गावाने बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवत बिनविरोध प्रक्रिया यशस्वीपणे राबवली आहे गावात विविध कार्यकारी सोसायटी आहे या सोसायटीची ही निवडणूक गेल्या दोन पंचवार्षिक पासून बिनविरोध झाली आहे

बिनविरोध निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे वेळोवेळी तरुण उमेदवारांना दिले जाणारे प्राधान्य तसेच ज्येष्ठांचा सल्ला व तरुणांचा सामंजस्य पणा याचा उपयोग होतो बिनविरोध निवड प्रक्रियेसाठी ॲड ललिता पाटील व ग्रामस्थ यांची मोलाची भूमिका असते म्हणून इतर गावांनी ब्राम्हणे या गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात

ग्रामपंचायत ब्राम्हणे तालुका अमळनेर बिनविरोध निवड २०२३ या वर्षी निवडून आलेले बिनविरोध उमेदवार वैशाली पाटील, शालुबाई पाटील, मनीषा पाटील, वंदना पाटील, राधेश्याम पाटील वरील सर्व बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचे ॲड. ललिता पाटील, प्रा. यादव सनेर, माजी सरपंच प्रवीण पाटील, विकासो चेअरमन गणेश भामरे, माजी उपसरपंच प्रकाश पाटील, धनराज पाटील, निवडणूक अधिकारी गायकवाड, ग्रामसेवक देवरे आप्पा सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले व पुढील कार्यकाळास शुभेच्छा दिल्या.

Protected Content