सावरकरांना भारतरत्न द्या, म्हणत शिवसेनेने उलटवला भाजपाचा डाव !

 

मुंबई (वृत्तसंस्था) स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या मग अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, असे म्हणत शिवसेनेने सभागृहात भाजपाचा गौरव प्रस्तावाचा डाव उलटवला. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपाने गौरव प्रस्तावची मागणी करत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.

 

भाजपाकडून वीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव सभागृहात मांडण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. मात्र हा प्रस्ताव फेटाळल्याने नाराज झालेल्या भाजपा आमदारांनी गोंधळ घालत सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वीर सावरकरांच्याबद्दल अपमानास्पद शब्द काँग्रेसच्या मासिकात वापरण्यात आला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शिदोरी मासिकावरही बंदी घालावी आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभेत गौरव प्रस्ताव आणावा. त्यावर भाजपाने ज्या प्रस्तावाची मागणी केली आहे. त्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या मग अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, यावर नितेश राणे यांचे मत घ्या, त्यांना प्रस्ताव मांडायला सांगा असा टोला संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी लगावला. यामुळे शिवसेनेने पद्धतशीरपणे भाजपाचा डाव त्यांच्यावरच उलटवला.

Protected Content