कर्नाटक सरकारची आडमुठ भूमिका ; सतेज पाटील संतापले

 

कोल्हापूर : वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी केल्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील कर्नाटक सरकारच्या  आडमुठेपणावर संतापले आहेत.

 

कर्नाटक सरकारने प्रवाशांना न रोखता त्याची आर टी पी सी आर टेस्ट करून राज्यात प्रवेश करायला परवानगी द्यावी. अन्यथा आम्हालासुद्धा कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागले, अशी रोखठोक भूमिका सतेज पाटलांनी घेतली.

 

“कोरोना संसर्ग वाढत असला तरी, महाराष्ट्रतील नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश द्यावा. कर्नाटक सरकार आडमुठी भूमिका घेत असेल तर आम्हालादेखील कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेबाबत मी केंद्राला माहिती देणार आहे,” असे सतेज पाटील म्हणाले. कर्नाटक सरकारने प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्यांना क्वॉरन्टाईन करावं, आम्हाला काहीही हरकत नाही, असंही ते म्हणाले.

 

 

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. वेगवेगळ्या राज्यांनी प्रतिबंधात्मक उपाय उपायांची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनेसुद्धा प्रवासासंबंधीचे नियम कडक केले आहे. कर्नाटक सरकारने नुकतंच माहाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटमध्ये प्रवेशबंदी केली आहे.

 

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारने प्रवेशबंदी केली आहे. केवळ ७२ तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारकडून प्रत्येक प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जातोय. पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना परत पाठवले जात आहे.  अचानक तपासणी सुरू करण्यात आल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. या प्रवाशांना रांगेत तास न् तास अडकून राहवं लागत आहे.   वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे.

 

Protected Content