पहूर येथे कृषी पंडीत मोहनलाल लोढा पतसंस्थेतर्फे पत्रकारांना सेफ्टी किटचे वाटप

पहूर ता.जामनेर, प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी पत्रकारांना वृत्ताकंन करण्यासाठी बाहेर पडावे लागत  आहे. यापार्श्वभूमीवर पहूर येथील पत्रकारांना सेफ्टी किटचे वाटप कृषी पंडीत मोहनलाल लोढा पतसंस्थेतर्फे करण्यात आले.

कोविड१९ या कोरोना विषाणूने देशात, राज्यात तसेच जिल्ह्यातही हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांना वृत्ताकंन करण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता कोरोना या संसर्गजन्य विषाणू पासून पत्रकारांना आपले संरक्षण करता यावे यासाठी पहूर येथील कृषी पंडीत मोहनलाल लोढा पतसंस्थेतर्फे सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक प्रदीप लोढा, चेअरमन बाबुराव पांढरे, व्यवस्थापक कैलास पाटील, उपसरपंच श्याम सावळे, अशोक देठे, प्रमोद पाटील यांच्या उपस्थितित पहूर येथील सर्व पत्रकार बांधवांना सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content