राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

 

शशिकांत शिंदे यांना माथाडी कामगार नेते म्हणून ओळखले जाते. तर अमोल मिटकरी यांनी विधानसभेच्या निवडणुकीवेळी जोरदार प्रचार केला होता. प्रचारादरम्यान त्यांची भाषणं प्रचंड गाजली होती. राष्ट्रवादीत त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी यांचे अनेकदा जाहीरपणे कौतुकही केले होते. अखेर त्यांना पक्षाकडून विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर अमोल मिटकरी यांना आमदार करणार, हा जाहीरपणे शब्द दिला होता. अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जात असताना अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांनी शिवस्वराज यात्रेच्या सभांमध्ये भाजपवर जोरदार टीका करत पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेतला होता.

Protected Content