पहूर ग्रामीण रूग्णालयासमोरील रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

पहुर ता. जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील ग्रामीण रूग्णालयाच्या समोर आणि वाकन रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून पहूर शहरात महत्वाच्या चौकात गतिरोधक नसल्यामुळे अनेक अपघात होतात. यात आपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पहूर-शेंदुर्णी रोडलगत पहूर ग्रामीण रूग्णालयासमोर व एकुलती वाकन रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. तसेचयाच रोडलगत आर. टी. लेले हायस्कूल असुन सायकलवर तसेच पाई जाणार्या विद्यार्थ्यांचीही वर्दळ असते. या ठिकाणी सतत अपघात होत असतात. तरी संबंधितांनी याठिकाणी त्वरित गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Protected Content