कोरोना हजाराच्या उंबरठ्यावर ! : आज ९९६ बाधीत रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना सुसाट वेगाने पसरत असून आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ९९६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जिल्ह्यात सर्वत्र संसर्ग पसरत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल ९९६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ५३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अर्थात, आता रूग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणार्‍यांची संख्या देखील वाढू लागल्याची बाब दिसून आली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधीक २१७ पेशंट आढळून आले आहेत. तर धक्कादायक बाब म्हणजे चोपडा तालुक्यात एकाच दिवसात तब्बल १८१ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील आजची आकडेवारी

आज जळगाव शहर- २१७, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-४२, अमळनेर-९१, चोपडा-१८१, पाचोरा-६५, भडगाव-१९, धरणगाव-७८, यावल-४०, एरंडोल-५५, जामनेर-६०, रावेर-२१, पारोळा-२८, चाळीसगाव-५९, मुक्ताईनगर-२३, बोदवड-११ आणि इतर जिल्ह्यातून ३ असे एकुण९९६ बाधित रूग्ण आढळून आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content