एमआयडीसी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामनवमी, रमजान ईद, बाबासाहेब आंबेडकर जयंती, व  हनुमान जयंती इत्यादी सणाच्या निमित्ताने बुधवारी २८ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.

 

याप्रसंगी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, थोर पुरुष, दैवत व महापुरुष यांना धर्मामध्ये न वाटता तसेच त्यांच्या प्रतिकृती डोक्यावर न घेता त्या थोर महापुरुषांचे विचार डोक्यात घालून समाजात वावरा व समाजाचे भले करा, तीच खरी श्रद्धांजली व जयंती त्या दैवतांना राहील,  असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

 

याप्रसंगी मुस्लिम मन्यार बिरादरीचे फारूख शेख यांनी प्रशासन व समस्त तरूणाई यांना सण एकमेकांच्या सोयी सवलती अनुसार आपण साजरे करूया, आमच्या उत्सवात दुसरे समाज बांधव उपस्थित झाल्यास तो आनंद अजून मोठा होईल म्हणून आपसात सुसंवाद साधून एकमेकांचे सामाजिक व धार्मिक वचनांचे देवाण-घेवाण होणे आवश्यक असल्याचे सांगून उपस्थितांना साने गुरुजी लिखित इस्लामी संस्कृती ही ५ पुस्तके भेट म्हणून दिले. याप्रसंगी नगरसेवक रवींद्र घुगे पाटील यांच्यासह सर्व समाजातील तरुण शांतता कमेटीच्या बैठकीला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपनीय विभागाचे प्रवीण पाटील यांनी तर आभार मंदार पाटील यांनी केले.

Protected Content