जिल्हा आरोग्य अधिकारी पहोचले आदिवासी वस्तीवर : वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कामाचे केले कौतुक

यावल, प्रतिनिधी | जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याचा लाभ अतिदुर्गम भागातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी वस्ती व पोहोचविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जामदार स्वतः जातीने हजर झालेत याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

कोविड लसीकरणाचा शेवटच्या घटकापर्यंत सर्व लाभ पोहचावे आणि कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आणि एकही माणूस लसीकरण विना राहू नये यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार हे आंबपनी व लगतच्या पाड्यावर पोहोचले. याबद्दल विशेष माहिती देताना किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांनी सांगितले की , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . भिमाशंकर जमादार स्वतः जबाबदारी घेऊन आमच्या सोबत अतिशय दुर्गम अशा सातपुडा पर्वत रांगामधील अंबापाणी व लगतच्या सर्व पाड्यावर आले. आणि आम्ही तेथें एकूण ८५ जणांना कोविड१९ लसीचे पाहिले डोस दिले. यावेळी डॉ. जमादार यांनी लोकांना कोविड लसीचे मह्त्व पटवून दिले आणि तसेच आरोग्य विषयक काहीही समस्या साठी जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क करावा असे आवाहन केल. डॉ मनिषा महाजन यांनी सांगितलं की, आजपर्यंत फक्त वैद्यकीय अधिकारी म्हणून मी आणि आमची टीम इथे सेवा द्यायला जायचे,जाताना रस्ता अतिशय खडतर आहे,सरांचं वय आणि मणकेचा आजार असताना देखील जमादार साहेब आमच्या सोबत आमच्या रुग्णवाहिकेमधून प्रवास करत आमच्या सोबत आले. तेथे त्यांनी स्वतः लोकांना समजलावून सांगितलं. त्यामुळे जमादार साहेबानी आमच्या समोर एक नवीन आदर्श उभा करून अविरत काम करण्याची प्रेरणा दिली. परंतू, जिल्हा स्तरातून आजवर कोणतेही जिल्हा आरोय अधिकारी या भागात फिरकले नाही आणि पण प्रथमच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार सर आल्यामुळे आम्हाला काम करत असताना येणाऱ्या अडचणी सरांना समजल्या. खरं तर आम्ही वर्षभर अति दुर्गम भागात सेवा देतो आणि कोविड१९च्या काळात माणुसकी जपून अत्यावश्यक गोष्टीचा पुरवठा पण आम्ही केला आणि या सर्व गोष्टी सरांनी स्वतः आदिवासी बंधू कडून जाणून घेतल्यात.
आज पर्यंत किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रचे काम कोविड लसीकरण च काम ९९ % झालेले असून १०० % टक्के करण्याचा आरोग्य केन्द्रातील माझे सोबतील सर्व कर्मचारी यांचा मानस असल्याचे डॉ. मनिषा महाजन यांनी सांगितलं. त्यासाठी आम्ही विशेष लसीकरण मोहीम राबवत आहोत. डॉ. मनिषा महाजन आणि त्यांच्या संपूर्ण पथकाच्या कार्याची दखल घेत डॉ. जमादार यांनी त्याचे कौतुक केले.
या प्रसंगी डॉ. बावणे, आयइसी सेलचे मिलिंद लोणारी, समुदाय आरोग्य अधिकारी मोहसीन शेख कुरेशी, आरोग्य सहयिका उषा पाटील, आरोग्यसेविका नावादी बारेला, आरोग्यसेवक विठ्ठल भिसे, आरोग्यसेवक मनोज बारेला, शिपाई सरदार कनाशा , वाहन चालक कुर्बान तडवी सर्व आशा वर्कर आणि आदिवासी विभाग डॉ. प्रवीण ठाकरे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content