बँकेने सील केलेले बंद घर फोडण्याचा प्रयत्न; तालुका पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवबा नगर परिसरात बँकेने सील केलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पवन वसंत सोनवणे रा. शिवबा नगर, जळगाव यांचे जळगाव शहरातील तालुका पोलीस हद्दीत असलेले गट नंब १८५ मध्ये प्लॉट नंबर २९ येथे घर आहे. सध्या हे घर आरसीएल बँक मुंबईल यांच्या ताब्यात असून ही घराच्या दरवाजाला कुलूपाला बँकेने सील लावले आहे. दरम्यान ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते १२ डिसेंबर रोजी सकाळी ८वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या इराद्याने घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पवन सोनवणे यांनी बँकेला माहिती दिली. दरम्यान दिपक कृष्णाजी शिंदे (वय-४१) रा. सिहस्थ नगर नवीन सिडको , नशिक यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल तायडे करीत आहे.

 

 

Protected Content