पूर्ववैमनस्यातून कांचननगरात तुंबळ हाणामारी; तीन जखमी

जळगाव प्रतिनिधी । पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास कांचननगरातील कालंका माता मंदीराजवळ घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कांचननगर परिरातील कालंका माता मंदिराजवळ गोलू (पूर्ण नाव माहित नाही) हा शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उभा होता. त्यावेळी विशाल नितीन सैदाणे रा. कांचननगर हा येवून गोलूला शिवीगाळ केली. गोलूने त्याचा मित्र मंगेश उर्फ पवन ईश्वर सोनवणे (वय-२०), हितेश संतोष शिंदे (वय-२०) दोन्ही रा. कांचननगर याला फोन करून बोलावून घेतले. हे पाहून विशाल सैदाने अधिकच भडकला व दोघांना शिवीगाळ करत पवनच्या डोक्याला लाकडी दांडका टाकला, हे कृत्य पाहून हितेशने भांडण सोडविण्या प्रयत्न केला व रात्री काहीसा वाद मिटविला होता.

दरम्यान, आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास पुन्हा विशाल नितीन सैदाणे व त्याचा मामा राजू जगन मोरे हे दोघे मंगेशच्या घरी येवून मंगेशसह त्याच्या वडीलांना शिवीगाळ करू लागले. विशालने लोखंडी हत्याराने डोक्यावर वार करून जखमी केले. दोन्ही गटातून झालेल्या वादाचे हाणामारीत रूपांतर झाल्याने दगड, विटा, कोयता व चाकूचा सर्रास वापर करण्यात आला. यात विशाला सैंदाणे, मंगेश सोनवणे आणि हितेश शिंदे तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रूग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा परस्परविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरूच होते.

Protected Content