चारचाकी वाहनाने एकाला चिरडले; नांद्रा येथील घटना

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नांद्रा येथे चारचाकी गाडी मागे घेतांना मागील बाजूस असलेल्या एका ४८ वर्षीय इसमास जोरदार धडक दिल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “नांद्रा ता. पाचोरा येथे मारुती (इको क्रं. एम. एच. १९ सी. झेड. ६२४७) ही चारचाकी गाडी चालक आनंदा हिरामण भोई रा. बांबरुड (महादेवाचे) हे मागे घेत असतांना मागील बाजूस काही अंतरावर रमेश परदेशी (वय – ४८) रा. नांद्रा ता. पाचोरा हे उभे होते.

दरम्यान वाहन चालकाने त्यांना जोरधार धडक दिली. या धडकेत रमेश परदेशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मयताचा मुलगा शुभम रमेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक आनंदा भोई यांचे विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे हे करीत आहे.

Protected Content