फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आषाढी एकादशीचे औचित्य साधून एस.बी.चौधरी हायस्कूल, चांगदेव येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी आपल्या कुंचल्यातून विठुरायाचे ३६ × २६ इंच आकारात पोस्टर कलरच्या माध्यमातून विलोभनीय पेंटिंग तयार करून विठुरायाला ‘संपूर्ण भारतात भरपूर पाऊस पडू दे’ असं साकडं घातले आहे.
विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे (भागवत धर्माचे) प्रमुख दैवत मानले जाते. विठोबा, विठुराया, पांडुरंग किंवा पंढरीनाथ या नावाने ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्रात व कर्नाटक या राज्यात पूजिली जाते. विठोबास विष्णू देवाचे रुप मानले जाते.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून एस.बी.चौधरी हायस्कूल, चांगदेव येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी आपल्या कुंचल्यातून विठुरायाचे ३६ × २६ इंच आकारात पोस्टर कलरच्या माध्यमातून विलोभनीय पेंटिंग तयार करून विठुरायाला संपूर्ण भारतात भरपूर पाऊस पडू दे असं साकडं घातले आहे.
हि पेंटिंग पाहिल्याल्यावर मन प्रसन्न होते. यात टाळ, मृदंग, वीणा व वारकरी दाखवण्यात आले आहेत. आजपर्यंत राजू साळी यांनी पौराणिक, सामाजिक, रचनाचित्रे, व्यक्तीचित्रे निसर्गचित्रे या विषयावर पैंटिंग तयार केलेल्या असून ते विद्यार्थ्यांनासुद्धा कलाक्षेत्रात मार्गदर्शन करीत असतात.