लक्ष्मीनगरात तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कानळदा रोडवरील लक्ष्मीनगरात एका महिलेला शिवीगाळ करतांना हटकल्याच्या रागातून अज्ञात तीन ते चार जणांनी तरूणाला बेदम माहराण व लोखंडी रॉडने गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवारी १० फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीला आली आहे. याबाबत शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, चेतन विष्णू इंगाले (वय-२८) रा. मारोती मंदीराजवळ शिवाजी नगर जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी वाहन चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. गुरूवारी १० फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कुवरखेडा येथून जळगाव शहराकडे येत असतांना कानळदा रोडवरील लक्ष्मी नगर येथे काही तरूण एका अनोळखी महिलेला शिवीगाळ करत होते. यावर चेतन इंगोले यांनी हटकल्याचा राग आल्याने तीन ते चार तरूण अंगावर धावून आले. त्यांनी दगड, विडांनी बेदम मारहाण केली. तर एकान हातातील लोखंडी रॉड चेतनच्या डोक्यात हाणला. यात चेतन गंभीर जखमी झाला व त्याला बाजूच्या नाल्यात ढकलून दिले. दरम्यान, स्वत:ची सुटका होण्यासाठी चेतन घटनास्थळाहून एका बाजूच्या गल्लीत जावून भावाला बोलावून घेतले. जखमीअवस्थेत त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Protected Content