चाळीसगावात पंतप्रधानांच्या वक्तव्याबद्दल; महिला काँग्रेसतर्फे जोरदार प्रत्युत्तर

चाळीसगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव पसरविण्यात कॉंग्रेस पक्षच जबाबदार असल्याची टीका केली होती. याला चाळीसगावात महिला काँग्रेसच्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देऊन निवेदनाद्वारे जाहीर निषेध नोंदविण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या भाषणात कोरोना विषाणू देशात पसरविण्यास कॉग्रेस पक्ष जबाबदार असल्याची टिका केली होती. या टिकेला चाळीसगावात महिला काँग्रेसच्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देऊन निवेदनाद्वारे जाहीर निषेध नोंदविण्यात आले. दरम्यान निवेदनात भारतीय जनता पक्षाने लॉकडाऊन काळात परप्रांतीय बांधवांना त्यांच्या मूळगावी जाणण्यासाठी मदत करणार्‍या देशभरातील नागरिकांबरोबरच महाराष्ट्र राज्याचा अपमान केला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना न करता अमेरिका राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व मध्यप्रदेश व कर्नाटकातील कॉग्रेस सरकार पाडण्यात व्यस्त असलेल्या केंद्र सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव देशभरात होऊ दिला आहे. हे वास्तव आहे. कोरोना महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. राज्ये आर्थिक अडचणीत आहेत. नवीन नोकर्‍या नाहीत, बेरोजगारी वाढत असतांना हया गंभीर मुद्दयावर चर्चा न करता  निव्वल कॉग्रेस द्वेष डोळयासमोर ठेवून कोरोना विषाणूचा फैलाव हा कॉग्रेस पक्षामुळे असे बेजबाबदार विधान करून कोरोनाच्या कठीण काळात मदत करणार्‍या असंख्य ज्ञात व अज्ञात बांधवांचा अपमान त्यांनी केला आहे. त्यांचा आम्ही महिला कॉग्रेस आघाडीच्या वतीने निषेध करत आहोत. अशा आशयाचे निवेदन चाळीसगाव तहसीलदारांना दिले आहेत.

या निवेदनावर महिला शहर काँग्रेस अध्यक्षा अर्चना ताई पोळ, रविंद्र पोळ, माजी आमदार ईश्वर जाधव, जेष्ठ नेते रमेश शिंपी, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मधुकर गवळी, गंगा खरटमल, मंगेश अग्रवाल, नामदेव चंदनशिव, भालचंद्र शिंदे, राधा गायकवाड, सरीता खरात,, आदींच्या सह्या आहेत.

Protected Content