जय बाबाजी भक्त परिवार विधानसभा निवडणूक लढणार – रामानंदजी महाराज

WhatsApp Image 2019 09 29 at 4.44.23 PM

पारोळा, प्रतिनिधी | राज्याच्या विधानसभा निवडणुकीत ३१ मतदार संघांत जय बाबाजी भक्त परिवार घेणार निर्णायक भूमीका वेरुळ येथे रामानंदजी महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. याप्रसंगी गणेश बोराडे उपस्थित होते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने औरंगाबाद, नाशिक, धुळे, नगर, पूणे आणि जालना या जिल्ह्यांतील २००० गावांमध्ये घरोघरी जाऊन राजकारणाचे शुध्दिकरण झालेच पाहिजे’  ही मोहीम परम पूज्य  स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवाराने राबविली होती. याचा परिणामस्वरुप नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव, शिर्डी,  जालना या ठिकाणचे खासदार निवडुन आले आहे. आणि संभाजीनगर (औरंगाबाद) येथील अपक्ष उमेदवारांनी ३ लाखांच्या आसपास मते घेतली, तरी ७ लोकसभा मतदार संघांत ३१ विधानसभेच्या जागा अशा आहेत. ज्या ठिकाणी जय बाबाजी भक्त परिवार हा निर्णायक आहे. लोकसभेप्रमाणे विधान सभेला सुध्दा देशहितासाठी योग्य उमेदवाराच्या बरोबर राहून त्याला निवडून आणण्याचा निर्धार जय बाबाजी भक्त परिवार करत आहे. आवश्यकता वाटल्यास काही निवडक ठिकाणी जय बाबाजी भक्त परिवार स्वत:चा उमेदवार देखील उभा करु शकतो, अशी माहिती रामानंदजी महाराज, श्री गणेश बोराडे यांनी दिली. विधानसभा मतदार संघांची नावे संभाजीनगर, नाशिक सिल्लोड नांदगांव कन्नड-सोयगांव मालेगांव बाय फुलंब्री, बागलाण  (सटाणा) संभाजीनगर मध्य कळवण संभाजीनगर पश्चिम चांदवड-देवळा, संभाजीनगर पूर्व, येवला-लासलगांव, पैठण सिन्नर, गंगापुर-रत्नपुर, निफाड, वैजापूर, दिंडोरी, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली (नाशिक ग्रामीण, )इगतपुरी – त्र्यंबकेश्वर, अहमदनगर, जळगाव, संगमनेर, रावेर- यावल,
राहाता-शिर्डी, एरंडोल- पारोळा, कोपरगाव, चाळीसगाव, श्रीरामपुर, भडगाव-पाचोरा, जालना, धुळे, अंबड-घनसांगवी, धुळे ग्रामीण, जालना, भोकरदन लढवतील असे त्यांनी पुढे सांगितले.

Protected Content