Home आरोग्य मास्क आणि हँण्ड वॉश रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करून द्यावेत :...

मास्क आणि हँण्ड वॉश रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करून द्यावेत : चंद्रकांत पाटील

0
58


मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

विधानसभेत बोलताना पाटील म्हणाले, कोरोना व्हायरस महाराष्ट्रात सुद्धा आला असून पुण्यात रुग्ण आढळून आली आहेत. कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, याच्या बचावासाठी सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानातून अत्यल्प दरात उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. आजच्या घडीला पुण्यात आठ आणि मुंबईत दोन आणि आता नागपूरात एक अशा एकूण ११ व्यक्तींना महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.


Protected Content

Play sound