Home Cities एरंडोल एरंडोल येथे मनसेतर्फे चीन विरोधात निवेदन

एरंडोल येथे मनसेतर्फे चीन विरोधात निवेदन

0
103

एरंडोल प्रतिनिधी । येथे तालुका व शहर मनसेतर्फे चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या पुतळ्याला चपला जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला.

चीनने केलेल्या हल्ल्यात आपले वीस जवान शहीद झाले असून याचा निषेध म्हणून चिनी मालावर बहिष्कार टाकुन चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या पुतळ्याला चपला जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच चीन सरकारचा निषेध करणारे निवेदन तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देवरे यांना मनसेतर्फे देण्यात आले. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष विशाल सोनार,मनसे शहर अध्यक्ष गोकुळ वाल्डे,उपविभाग अध्यक्ष सागर पाटील, विजेंद्र वाघ, अनिल पाथरवट उपस्थित होते.


Protected Content

Play sound