Home क्राईम जळगावजवळ सत्संगासाठी जाणाऱ्या आदिवासी भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात ; १९ जण जखमी

जळगावजवळ सत्संगासाठी जाणाऱ्या आदिवासी भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात ; १९ जण जखमी

0
6


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मध्य प्रदेशात आयोजित सत्संग कार्यक्रमासाठी जात असलेल्या भुसावळ तालुक्यातील आदिवासी भाविकांच्या ४०७ मालवाहू वाहनाला जळगावजवळ अपघात झाला. कानळदा रोडवरील बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ वाहनाच्या मागील चाकाचा एक्सल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन दोन वेळा पलटी झाले. या अपघातात महिला, पुरुष आणि लहान मुलांसह एकूण १९ जण जखमी झाले असून, सर्व जखमींवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भुसावळ तालुक्यातील वराड सिम, कुऱ्हा, मोंढाळा, खंडाळा, सिंधी आणि मांडवा परिसरातील आदिवासी बांधव मध्य प्रदेशात आयोजित सत्संग कार्यक्रमासाठी ४०७ मालवाहू वाहनातून प्रवास करत होते. सत्संगासाठी श्रद्धेने निघालेल्या या भाविकांच्या प्रवासात कानळदा रोडवर अचानक अपघात घडल्याने मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव शहराजवळील कानळदा रोडवरील बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ वाहनाच्या मागील चाकाचा एक्सल तुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावर दोन वेळा पलटी झाले. या घटनेमुळे वाहनातील प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. अचानक घडलेल्या या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जखमींना रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनांच्या मदतीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व १९ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, अपघातामुळे भाविकांच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला.


Protected Content

Play sound