विद्यापीठात ‘नेट, सेट आणि पेट मार्गदर्शन’ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दि. ९ ते ११ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ‘जनंसवाद आणि पत्रकारिता : नेट, सेट आणि पेट मार्गदर्शन’ या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. रा.ल.शिंदे यांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविण्यासाठी परीश्रम, चिकाटी, दीर्घ अभ्यास, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन ही पंचसूत्रे अंगिकारल्यास आपली गुणवत्ता सिद्ध करता येते. जनसंवाद आणि पत्रकारिता हा विषय अतिशय महत्वपूर्ण असून मानवी जीवनाशी निगडीत आहे. केवळ या विषयाच्याच विद्यार्थ्यांसाठी हा विषय उपयुक्त नसून इतर विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तो उपयुक्त आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर यांनी केले. त्यांनी कार्यशाळेचा आढावा मांडला. कार्यशाळेच्या सकाळच्या सत्रात प्रा. राहूल चौधरी (तुलजाराम महाविद्यालय, बारामती) यांनी `चित्रपट आणि दृश्य संवाद` या विषयावर तर प्रा. डॉ. उज्वला बर्वे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी `संवाद संशोधन` या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. गोपी सोरडे यांनी केले.  डॉ. विनोद निताळे यांनी आभार मानले. या ऑनलाईन कार्यशाळेची तांत्रिक बाजू डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांभाळली.

कार्यशाळेच्या दुस-या दिवशी (दि. १० फेब्रुवारी) सकाळच्या सत्रात प्रा. डॉ. रवींद्र चिंचोलकर (पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर) यांनी `जनसंपर्क आणि कार्पोरेट कम्युनिकेशन` या विषयावर तर प्रा. डॉ. शाहेद शेख (औरंगाबाद) यांनी `माध्यम कायदा आणि नितिमत्ता` या विषयावर मार्गर्दर्शन केले. दुपारच्या सत्रात प्रा. डॉ. मीरा देसाई (एस.एन. डी. टी. विद्यापीठ, मुंबई) यांनी `माध्यम आणि व्यवस्थापन आणि निर्मिती` या विषयावर तर डॉ. सोमनाथ वडनेरे (कबचौउमवि, जळगाव) यांनी `माहिती आणि संवाद तंत्रज्ञान आणि माध्यमे` या विषयावर पॉवर पॉईंट प्रेसेंटेशनद्वारे सखोल मार्गदर्शन केले.

यशस्वीतेसाठी जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील कर्मचारी सौ. रंजना चौधरी, प्रल्हाद लोहार, प्रकाश सपकाळे, अभय सोनवणे, विष्णु कोळी यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेत महाराष्ट्रातून जवळपास २६० विद्यार्थी झुमअॅप व युट्यूब या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहभागी झाले.

 

Protected Content