पालकमंत्र्यांनी दिला २५ लाखाचा निधी

कासोदा प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथून जवळच असलेल्या बांभोरी या छोट्या गावाला भेट दिली असून या गावाकडे जाणाऱ्या पुलासाठी पालकमंत्रींनी २५ लाखाचा निधी दिली आहे. यावेळी ग्रामस्थ प्रचंड आनंदात होते.

या गावात देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झालीत, पण कोणताही मंत्री या गावाने पाहिलेला नव्हता, गुलाबराव पाटील हे पहिलेच मंत्री आहेत की, त्यांनी या गावाला भेट तर दिलीच पण या गावाची रस्त्याची अडचण कायमची दूर केली आहे. फक्त १८० मतदार असलेले व राजकीय दृष्ट्या दूर्लक्षीत हे गांव.मतदार संख्या अत्यल्प असल्याने या गावांसाठी विकास कामांसाठी मोठा निधी आजतागायत मिळालेला नाही, या गावात जाण्यासाठी रस्ता देखील जेमतेम आहे, एरंडोल ते कासोदा या राज्यमार्गावर येण्यासाठी एक नाला आडवा तेतो,या नाल्याला पूर आला की गावाचा संपर्क तूटतो, शेतकऱ्यांना नाल्यातून बैलगाडी नेतांना मोठे हाल होतात,या सर्व समस्या जाणून घेऊन मतदार संघ नसतांना व अत्यंत लहान खेडे असतांना देखील पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी नाल्यावरील पूल व एक कि.मी.डांबरीकरणासाठी २५ लाख रुपये एवढा भरघोस निधी देऊन या कामाचे नारळ वाढवून शुभारंभ केला आहे.

राज्याचे मंत्री कसे असतात,हे स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली तरी या खेड्याने अनूभवले नव्हते, त्यामुळे मंत्री येणार असल्याने मोलमजुरी करणारे ह्या गावातील बायाबापड्या व मजूर आज दिवसभर घरीच होते, मंत्र्यांना बघण्यासाठी गावातील अबालवृद्धांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.

मंत्र्यांसोबत जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन,सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल माने, तालुकाध्यक्ष वासूदेव पाटील, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, जगदीश पाटील, रविंद्र चौधरी,उमेश पाटील, राजेंद्र वाणी, स्वप्नील बियाणी,सह अनेक मान्यवर उपस्थित होते. गावातील पोलिस पाटील सह सर्वच नागरिक व भगीनींनी मंत्र्यांचे स्वागत केले, प्रास्ताविक प्रमोद पाटील यांनी केले तर आभार उमेश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविंद्र चौधरी, राजेंद्र वाणी, भगवान खैरनार, नारायण पाटील,गोपीचंद पाटील यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content