पिंपळकोठा येथील समाज मंदीर चांगल्या जागेवर बांधा – ग्रामस्थांची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी |  एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील बांधण्यात येणारे समाज मंदीर इतरत्र चांगल्या जागेवर बांधण्यात यावी अशी मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी भेट घेवून निवेदन दिले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा बुद्रुक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज मंदीराच्या बांधकामाला शासनाने परवानगी दिली आहे. परंतू गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने मिळून सदरील मंदीर हे घाणेरड्या जांगेवर बांधकाम केले जात आहे. या मंदीर बांधकामाला दलित समाजाच्या वतीने तिव्र विरोध केला जात आहे. दरम्यान मंदीराचे बांधकाम झाल्यास भविष्यात मोठा वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गावातील चांगल्या जागेवर किंवा दलीत वस्तीतच समाज मंदीर बांधण्यात यावी अशी मागणीचे निवेदन दिले आहे. या मागणीसाठी दलीत समाज बांधवांसह गावातील ग्रामस्थ यांनी मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले. या निवेदनावर शशीकांत मोरे, गौतम फुला मोरे, अभिमन मोरे, अमोल मोरे, कलाबाई मोरे, जनाबाई मोरे, सरूबाई मोरे, प्रियंका मोरे, कोकीळाबाई मोरे आदींच्या स्वाक्षऱ्‍या आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/480391430110108

Protected Content