महापालिका सफाई कामगाराची दुचाकी लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील शौचालयासमोर उभी सफाई कामगाराची दुचाकी लांबविल्याप्रकरणी बुधवार, ८ मार्च रोजी सायंकाळी पावणे सात वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील गुरूनानक नगरात अनिल विाकस गोयर वय ६० हे वास्तव्यास आहेत. ते महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ६ मार्च रोजी अनिल गोयर हे नवीन बसस्थानकात आले होते, यादरम्यान रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची एम.एच.१९ डी.एम.४०२७ या क्रमाकांची दुचाकी बसस्थानक आवारात असलेल्या शौचालयाच्या समोर उभी केली होती, दुसऱ्या दिवशी  सकाळी ४ वाजता उठल्यावर त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही, सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने बुधवारी अनिल गोयर यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन १० हजारांची दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी अज्ञात चोरटयांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहेत.

Protected Content