चाकूचा धाक दाखवून तरूणाचा मोबाईल लांबविला; धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  धरणगाव तालुक्यातील टाकरखेडा शिवारातील बांभोरी गावाजवळील आदीवासी मुलांचे वसतीगृह येथे तरूणाला चाकूचा धाक दाखवत १२ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रोहित विनानेद पाटील वय-२० रा. दोनगाव ता.यावल ह.मु. वैजनाथ ता.एरंडोल येथे वास्तव्याला आहे. शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता  बांभोरी ते वैजनाथ रस्त्यावरील आदिवासी मुलांचे वसतीगृहजवळून दुचाकीने जात असतांना अज्ञात व्यक्तीने हात दाखवून रस्ता आडविला. त्यानंतर रोहितच्या मानेवर चाकू लावून त्यांच्याजवळून १२ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून पसार झाला. यानंतर शनिवारी २३ डिसेंबर रोजी सायंकाही ६ वाजता तरूणाने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरूण रामचंद्र निकम हे करीत आहे.

Protected Content