तांबापूरा येथील विवाहितेचा पैशांसाठी छळ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील तांबापूरा येथील माहेर असलेल्या विवाहितेला धुळे येथील सासरी १ लाखांची मागणी करत शारिरीक व मानसिक छळ केल्याची तक्रार शनिवारी २३ डिसेंबर सायंकाळी ६ वाजता देण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील तांबापूरा येथील माहेर असलेल्या नफिसाबी नईम खान (वय-३५) याचा विवाह धुळे येथील नाईम खान अफजल खान यांच्याशी रितीरीवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले त्यानंतर विवाहितेला काम धंद्यांसाठी माहेरहून १ लाख रूपयांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ करत मारहाण केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार शनिवारी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहे.

Protected Content