खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जगीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २३ डिसेंबर रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात खासगी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगतारसिंग बिक्करसिंग बिलींग वय-४५ रा. वरणगाव ता.भुसावळ असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरून जगतारसिंग उर्फ तारा बिक्करसिंग बिलींग हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शनिवारी २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने वरणगाव येथे घरी जात असतांना त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी बस (क्रमांक एमएच ४० एटी ०२८९) ने जोरदार धडक दिली. या अपघातात जगतारसिंग हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी सायंकाळी ७ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात खासगी बस चालक वाजीद असमत अली रा. जयहिंद नगर, नागपूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नावेद अली सैय्यद हे करीत आहे.

Protected Content