हॉस्पिटलजवळून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील प्रभात कॉलनी चौकातील पल्स क्रिटीकल केअर हॉस्पिटलच्या भिंतीजवळून तरुणाची दुचाकी लांबविल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे जितेंद्र प्रकाश राजपूत हे वास्तव्यास आहेत. ७ मार्च रोजी जितेंद्र राजपूत हे जळगावात आले होते, यादरम्यान त्यांनी त्यांची एम.एच. १९ बी वाय ५६८२ या क्रमाकांची दुचाकी प्रभात कॉलनी चौकातील पल्स क्रिटीकल केअर या हॉस्पिटलच्या जवळ उभी केली होती, दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास दुचाकी आढळून आली नाही, सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने जितेंद्र राजपूत यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहेत.

Protected Content