जामनेरात शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी तालुका महाविकास आघाडीतर्फे राज्य सरकारच्या विरोधात गुरूवारी ९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता  जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्या पाटील आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

 

यावेळी कपाशीला भाव वाढ मिळावा, कांद्याला ५ हजार रुपये प्रती क्विंटल हमीभाव देण्यात यावा वन्य प्राण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, महावितरण कडून शेतकऱ्याची विविध तोडणी तात्काळ थांबवण्यात यावी, शेती पंपाला १२ तास वीज मिळावी, यांच्यासह विविध मागण्यासाठी यांना कृषी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बैलगाडीसह मोर्चा काढण्यात आला असून यावेळी राज्य सरकारच्या विरोधात निषेध नोंदवून घोषणा देण्यात आल्या.

 

याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्यने  उपस्थित होते.

Protected Content