सामजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा – सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

जळगाव,लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कर्नाटकातील हिजाब विरोधी आंदोलन महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था विद्यापीठातून पसरवून सामाजिक स्वास्थ बिघडवणारे समाजकंटक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

आम्ही कोणत्या धर्माचे पालन करावे काय खावं व काय परिधान करावं हा आमचा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे आमच्या संविधानिक  अधिकारात कोणी हस्तक्षेप करू नये.  हिजाब आमचा संविधानिक अधिकार असून आम्ही तो पळणारच असा ठाम निश्चय विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. मुस्लिम महिलांचा शिक्षणातील प्रमाण आधीच कमी आहे. विद्यापीठांमधील शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी विशाल गावित यांनी केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, देशात विशेषतः उत्तर प्रदेशातील निवडणुकीत एका धर्मांध पक्षाला मतदान व्हावे म्हणून कर्नाटक मधील काही कॅालेजमध्ये हिजाब विरोधी आंदोलन करून शिक्षणाला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न चालू आहे. अल्पसंख्यांकांच्या वर्गाला टार्गेट करून त्यांच्या जीवन पध्दतीवर हल्ले करण्याचा प्रयत्न काही धर्मांध शक्ती कडून केला जात आहे. मुस्लिम समाजातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.त्यांची शैक्षणिक स्थिती SC/ST वर्गापेक्षा कमी आहे.अशा स्थितीत गरिब मुस्लिम पालक आपल्या मुलींना अल्पसंख्यांकांच्या संस्था असतील किंवा ईतर धर्मियांनी संस्थांनी चालविलेल्या संस्थामध्ये या मुली शिक्षण घेत आहेत. त्यांच्या जीवीताचे त्यांच्या अधिकाराचे संरक्षण करणेचे काम आपण जिल्हाधिकारी वडील म्हणून आपले कर्तव्य आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक संकुलातील वातावरण दूषित होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाशी बोलून जिल्हयात शांतता व सौहार्द राहील याची चोख व्यवस्था ठेवणे आपले परमकर्तव्य असल्याचे सम्यक विद्यार्थी आंदोलन अध्यक्ष महेश भारतीय यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे. निवेदनावर विकास बिऱ्हाडे, आमीर शेख चेतन जाधव, सायमा शेख, बुशरा शेख आदींची स्वाक्षरी आहे.

Protected Content