जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जांना त्रुटी पुर्तता व कागद पत्रांची पुर्ततेसाठी मुदतवाढ

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना अर्जांतील त्रुटी पूर्तता, कागद पात्रांची पूर्तता करण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

 

अर्जदारांनी ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी ईमेल आय डी , फोन नंबर स्वतःचा किंवा पालकांचा दयावा, त्रयस्थ व्यक्तीचा देण्यात येवू नये कारण असे प्रकारच्या त्रुटी अथवा व्हॅलीड होण्याचे एसएमएस आणि ई – मेल आपण दिलेल्या आयडी व मोबाईलवर ऑटो पाठविले जातात. तसेच ऑनलाईन फॉर्म भरतांना सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावे. तरी उमेदवारांनी वेळेत येवून पुर्तता करुन आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, अन्यथा या कालावधीत अर्जदारांकडून त्रुटी पुर्तता न करण्यात आल्यास सदर प्रकरणे बंद करण्यात येतील असे आवाहन संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content