डॉ. संतोष पाटील यांनी केली पक्षांसाठी अन्न व पाण्याची सोय

 

पाचोरा, प्रतिनिधी  ।  तालुक्यातील गोराडखेडा येथील शिक्षक तथा व्याख्याते डॉ. संतोष पाटील यांनी सपत्नीक पक्ष्यांसाठी अन्न व पाण्या साठी विभिन्न ठिकाणी बॉटल टांगल्या आहेत.

 

डॉ. संतोष पाटील व त्यांच्या सौभाग्यवती वंदना पाटील यांनी जवळपास शंभर ठिकाणी पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याचे द्रोण व बॉटल बांधल्या. त्याचबरोबर पक्ष्यांना अन्न व धान्याच्या सोयीसाठी त्यांनी विभिन्न ठिकाणी द्रोण टांगले. यावर्षी अत्यंत कडक उन्हाळा असल्यामुळे पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची व अन्नधान्याची टंचाई भासू शकते त्यामुळे संतोष पाटील व त्यांच्या सौभाग्यवती यांनी विभिन्न ठिकाणी रस्त्याने लागणार्या झाडांवरती द्रोण व पाण्याच्या बॉटल बांधून पक्ष्यांसाठी व्यवस्था केली  याबरोबरच त्यांनी तिथे पाणी व धान्य सुद्धा  टाकले. येणाऱ्या उन्हाळ्यात सुद्धा पाण्याची व धान्याची पक्ष्यांसाठी सोय करून  काळजी घेऊ असे त्यांनी सांगितले. पक्ष्यांसाठी त्यांनी लोकांनी फेकून दिलेल्या बॉटल्स बिस्लरी बॉटल्स बांधल्या यामुळे  प्रदूषणाला सुद्धा आळा बसेल. पक्ष्यांना धान्याच्या सोयीसाठी त्यांनी कुंभार बांधव यांच्याकडील बनवलेले मातीचे द्रोण बांधले. आपण सगळ्यांनी असे केल्यास स्थानिक कारागिरांना सुद्धा काम मिळेल व प्रदूषण कमी होईल सर्व पक्षांचे पण संरक्षण केले जाईल.

Protected Content