जिल्ह्यासाठी ३९ टन लिक्विड ऑक्सिजन येणार: खडसेंची आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा

 

जळगाव : प्रतिनिधी । माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशानासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी ३० टन लिक्विड ऑक्सिजन तात्काळ पुरवण्याची मागणी मान्य झाली आहे 

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांना एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा असल्याचे समोर आल्यानंतर यासंदर्भात माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशानासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत चर्चा करत जिल्ह्याला  ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी केली. त्यानुसार रविवारसकाळपर्यंत जळगाव जिल्ह्यासाठी ३९ टन लिक्विड ऑक्सिजन पोहोचणार आहे. यानिमित्ताने खडसेंच्या प्रयत्नांनी जिल्ह्याला ऑक्सिजनच्या पुरवठ्याची कमतरता भासणार नाहीय.

जळगाव जिल्ह्यात दिवसाला साधारण ११०० पेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या समोर येत आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असलेल्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली असली तरी पुरवठा मात्र मर्यादीत आहे. त्यामुळे आतापर्यंत जळगावात पुरवठ्यावर परिणाम झालेला नसला तरी आगामी काळात मागणी वाढत राहिल्यास पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता पुरवठादाराने व्यक्त केली होती. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांना एकदिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा असल्याचे समोर आले होते. याची गंभीर दखल घेत माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्याकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. 

त्यानुसार जिल्ह्यात एकच दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा असल्याचे लक्षात आल्यानंतर खडसे यांनी तात्काळ आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशानासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत चर्चा करत ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी केली. त्यानुसार   रविवार  सकाळपर्यंत जळगाव जिल्ह्यासाठी ३९ टन लिक्विड ऑक्सिजन पोहोचणार आहे. 

 

खडसेंच्या प्रयत्नांमुळे जळगाव जिल्ह्याला सध्यातरी आता ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाहीय. दुसरीकडे खडसे यांनी चर्चा रेमडेसिव्हर इंजेक्शनबाबत चर्चा केल्यानंतर चार हजार इंजेक्शन जिल्ह्यात पाठविण्यात आले होते.  आता देखील येत्या दोन दिवसात आवश्यक असतील तेवढे रेमडेसिव्हर इंजेक्शन पाठविण्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशानासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एकनाथराव खडसे यांना दिले आहे. पुढील दोन दिवसात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

Protected Content