पारोळा आणि एरंडोल तालुक्यातील रस्त्यांसह पुलांच्या कामासाठी ४० कोटीचा निधीला मंजूरी

आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामासाठी ४० कोटी ४८ लाखांची निधीला मंजूरी मिळाली आहे. आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नाने हा निधी मिळाल्याने परिसरातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

एरंडोल मतदारसंघात आजपावेतो १४०० ते १५०० कोटींची कामे सुरु आहेत. त्यात रस्ते, पूल, गावांमधील मुलभूत सुविधेची कामे यांसह अनेक विधायक कामांचा समावेश आहे. स्वातंत्र्य काळापासून ते आजवर जी कामे दुर्लक्षित होती, जी कामे जनतेच्या मनातील होती अशा कामांना आ.चिमणराव पाटील हे आपल्या संकल्पनेतून साकारत आहेत. यात प्रामुख्याने स्वतंत्र काळापासूनची जी ग्रामीण भागातील दुर्लक्षित गाव होती, ज्या गावांचा पाऊस, वारा, वादळ असतांना पूर्णपणे संपर्क तुटायचा अशा गावांना थेट तालुक्याशी व मुख्य रस्त्यांना जोडण्याचे काम आमदार चिमणराव पाटील हे करीत आहेत. ग्रामीण भागात या सुविधांअभावी शैक्षणिक, आरोग्य यांसारख्या मोठ्या दैनंदिन समस्यांना नागरिक हैराण झाले होते. अशा विधायक कामांना आमदार चिमणराव पाटील हे आपल्या दूरदृष्टीने साकारत आहेत.

यात मोंढाळे पिंप्री ता.पारोळा, लोणी बु ता.पारोळा, लोणी खु ता.पारोळा, लोणीसीम ता.पारोळा, मोंढाळे प्र.अ. ता.पारोळा, एरंडोल ते पुरा या गावांना जोडण्यासाठी मोठ्या पुलांना मंजुरी आणली. पारोळा व एरंडोल शहराचा ज्वलंत व जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न असेल त्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली, अगदी लहान्यासाठी ते थोरल्यांपर्यंत लोकाभिमुख असलेली कामे आज मतदारसंघात सुरु आहेत आणि हे असतांना देखील आज पुरवणी अर्थसंकल्पातून तब्बल ४०.४८ कोटीचा निधी रस्ते व पुलांसाठी मंजूर करून आणला.

यात पारोळा तालुक्यातील देवगाव गावाजवळ पुलाचा बांधकामासाठी – ९८.३५ लक्ष, पारोळा शहरातील अमळनेर नाका ते शनी मंदिरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणेसाठी – ३.०० कोटी, शिरसमणी ते तालुका हद्द पर्यंत रस्त्याचा दुरुस्तीसाठी – ३.०० कोटी, राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ते पळासखेडे पर्यंत रस्त्याचा दुरुस्तीसाठी – ३.०० कोटी, पारोळा ते पुनगांव रस्त्याचा पुलासह दुरुस्तीसाठी – २.०० कोटी, कन्हेरे ते सावखेडा रस्त्याचा दुरुस्तीसाठी – ३.०० कोटी, भोंडण ते चोरवड रस्त्याचा दुरुस्तीसाठी – १.५० कोटी, मुंदाणे प्र.अ.ते सोके रस्त्याचा पुलासह दुरुस्तीसाठी – ३.०० कोटी

एरंडोल तालुक्यातील जवखेडे बु व जवखेडे खु या गावांना जोडण्यासाठी अंजनी नदीवर पुलाचा बांधकामासाठी ५.६० कोटी, राष्ट्रीय महामार्ग ते सावदा गावामधील लांबीची दुरुस्तीसाठी – २.८० कोटी, राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ते जवखेडा मधील खराब लांबीचा दुरुस्तीसाठी – १.०० कोटी, फरकांडे ते लोणी रस्त्याचा दुरुस्तीसाठी – ०१.५० कोटी, कासोदा ते जवखेडासीम मधील खराब लांबीचा दुरुस्तीसाठी – ९०.०० लक्ष, तळई ते अंतुर्ली मध्ये पुलाचा बांधकामासाठी – ०१.२० कोटी

भडगांव तालुक्यातील गिरड गावातून जाणाऱ्या रस्त्याचा दुरुस्तीसाठी – ०३.०० कोटी, भातखंडे गावाजवळ पुलाच्या बांधकामासाठी – २.५० कोटी व पिंपरखेड आंचळगांव रस्त्यावर पुलाचा बांधकामासाठी – २.५० कोटी अशा एकूण ४०.४८ कोटी रुपयांचा कामांना मंजुरी मिळाली आहे. यात मुख्य बाब म्हणजे एरंडोल तालुक्यातील जवखेडे बु व जवखेडे खु या गावांना जोडण्यासाठी अंजनी नदीवर पुल हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. नदीला साधे पाणी जरी सोडण्यात आले तरी या गावाचा संपर्क तुटत होता. हे गेल्या स्वतंत्र काळापासून हे नागरिक या समस्यांना त्रासले होते, आज या गावाला देखील पुलाचा मंजुरीमुळे प्रवाहात आणण्याचे विधायक काम आमदार चिमणराव पाटील यांनी केले आहे.

Protected Content